७२४९ ८५४९ ९९ | ७७२० ९६१ ००० contact@ujjwalbhavishyasanstha.org पिंपळभाट, सुरुची हॉटेल समोर, अलिबाग
सहजानंद आध्यात्मिक गोपाळ निवास

रुढाश्रम नाही — हे आहे ज्येष्ठांचे खरेखुरे होस्टेल

घर आणि वृद्धाश्रम यांच्यातला मध्य साधण्याचा प्रयत्न. ६० ते ८० वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना सोबत, संवाद आणि आनंदी सहजीवन देणारी जागा.

What are you craving today?

All Items
Burgers
Pizza
Chicken
Wraps
Pasta
Desserts

Trending Searches

Smash Burger Nashville Chicken Truffle Pizza Lava Cake Loaded Fries Mango Shake
12+Years of
Excellence
Senior Citizion Hostel
Senior Citizion Hostel
संकल्पना

वृद्धाश्रम आणि घर यांच्यातला मध्य

उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था संचलित सहजानंद अध्यात्मिक गोपाळ निवास (ज्येष्ठ नागरिकांचे होस्टेल) या संकल्पनेतून रुढाश्रम आणि घर यातून ज्येष्ठ नागरिकांचे होस्टेल असा मध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे. या होस्टेलमध्ये विविध वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना अॅडमिशन दिले जाते.

६० ते ८० वयोगटातील लोकांशी बोलणे, त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांच्याबरोबर फिरायला जाणे, विरंगुळ्यासाठी गेम खेळणे, त्यांच्या सहवासात राहणे ही जास्त गरज असते. थोडक्यात लहान बाळासोबत जसे वागतो, त्यांचे हट्ट पुरवतो — तसेच त्यांच्यासोबतही वागावे लागते. आणि या सर्व गोष्टींची पूर्तता या होस्टेलमध्ये नक्की होते.

आजची गरज

आधुनिक कुटुंब पद्धतीमुळे निर्माण झालेली पोकळी

अलीकडच्या आधुनिक काळात तरुण पुढील कामासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी देशात-परदेशात वास्तव्य करावे लागते, तसेच विभक्त कुटुंब पद्धती अशा अनेक कारणांमुळे मुलांची इच्छा असूनही पुरेसा वेळ मिळत नाही.

परदेशी मुलांना आई-वडिलांविषयी चिंता, काळजी असते. या काळजीमुळे त्यांना कामावर निश्चितपणे जाता येत नाही. अशा वेळी ज्येष्ठांना एकमेकांच्या साथीची, एकमेकांशी बोलून सुख-दुख वाटून घेण्याची गरज वाटू लागते — जसे मुला-मुलींचे हॉस्टेल असते, त्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचेही हॉस्टेल असावे, ही संकल्पना.

या संकल्पनेतून एकमेकांच्या वयाचे मित्र-परिवार एकमेकांना मिळेल. इथे नवीन नाती घडतील आणि त्यांचे जीवन आनंदाने जगतील.

Senior Citizion Hostel
Senior Citizion Hostel
होस्टेलमध्ये काय मिळते

घरगुती वातावरण, समवयस्क सोबत

संवाद व सोबत
समवयस्क ज्येष्ठ नागरिकांसोबत रोजच्या गप्पा, अनुभवांची देवाणघेवाण आणि एकटेपणा दूर करणारा सहवास.
विरंगुळा व खेळ
विरंगुळ्यासाठी खेळ, एकत्र फिरायला जाणे आणि आनंदी मनोरंजनाचे उपक्रम नियमितपणे आयोजित केले जातात.
जेवण व निवास
स्वच्छ, घरगुती जेवण व्यवस्था आणि निवासाची आरामदायी सोय — स्वतःच्या घरासारखे वातावरण.
आध्यात्मिक वातावरण
सहजानंद अध्यात्मिक गोपाळ निवास या नावाला साजेसे शांत, अध्यात्मिक व सकारात्मक वातावरण.
आरोग्य सेवा जोड
संस्थेच्याच २४ तास नर्सिंग दवाखान्याशी व मोफत आरोग्य तपासणी शिबिरांशी थेट संलग्नता.
कुटुंबाशी संपर्क
परदेशात किंवा अन्य शहरात असलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या सुरक्षित सहवासाची निश्चिंती.
वैयक्तिक काळजी
लहान बाळासोबत जसे प्रेमाने वागतो, तसीच आपुलकी व सहनशीलता ज्येष्ठांसाठी कर्मचाऱ्यांकडून दिली जाते.
सांस्कृतिक सहभाग
संस्थेच्या सांस्कृतिक कार्यक्रम, सणवार आणि सामाजिक उपक्रमांमध्ये ज्येष्ठांचा सक्रिय सहभाग.
Senior Citizion Hostel
Senior Citizion Hostel
प्रवेश प्रक्रिया

होस्टेलमध्ये प्रवेश कसा घ्यावा

उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था ही नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आहे (रजि. क्र. एफ. ००१५५२ (RGD)). समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी — गरजू, अपंग, महिला, मुले आणि भटक्या प्राण्यांसाठी — कार्यरत.

संपर्क करा

दवाखाना किंवा संस्थेच्या कार्यालयाशी फोनवर अथवा प्रत्यक्ष भेट देऊन संपर्क साधा.

भेट व पाहणी

खंडाळे येथील निवासाला भेट द्या — वातावरण, सुविधा व कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष माहिती घ्या.

आरोग्य तपासणी

प्रवेशापूर्वी प्राथमिक आरोग्य तपासणी — संस्थेच्या दवाखान्याच्या डॉक्टरांकडून.

नोंदणी व अॅडमिशन

आवश्यक कागदपत्रे व नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून ज्येष्ठ नागरिकांना अॅडमिशन दिले जाते.

नियमित भेट व संपर्क

कुटुंबीयांना नियमित भेट व संवादाची मुभा — नवीन नाती जपत आनंदी सहजीवन.

संस्थेबद्दल अधिक जाणून घ्या

आपल्या ज्येष्ठ कुटुंबीयांसाठी प्रेमळ सोबत शोधत आहात?

सहजानंद आध्यात्मिक गोपाळ निवास, खंडाळे-अलिबाग येथे भेट द्या आणि स्वतः अनुभव घ्या.

भेटीची वेळ ठरवा आरोग्य सेवा पाहा
आपल्या ज्येष्ठ कुटुंबीयांसाठी प्रेमळ सोबत शोधत आहात?