All Items
Burgers
Pizza
Chicken
Wraps
Pasta
Desserts
Trending Searches
Smash Burger Nashville Chicken Truffle Pizza Lava Cake Loaded Fries Mango Shake

उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था अलिबाग रायगड या संस्थेच्या माध्यमातून यशोदामाई सांस्कृतिक स्कूल योजनेच्या माध्यमातून 'सिग्नल स्कूल' च्या नावाने अलिबाग शहरातील मुख्य रहदारीच्या रस्त्यावरील एस-टी स्थानक परिसरातील गजरे, हार, फुले तसेच हंगामी किरकोळ साहित्य रस्त्याच्या कडेला बसून विक्री करणाऱ्या कुटुंबातील ३-१२ वर्ष वयोगटातील मुलांसाठी ऑक्टोबर-२०२४ पासून काम सुरू आहे.
रोज संध्याकाळी ६.०० ते ८.०० च्या दरम्यान या मुलांबरोबर वेळ दिला जातो — स्वच्छतेच्या सवयी, सोपी-सोपी गाणी व गोष्टींच्या माध्यमातून मराठी मुळाक्षरे, अंक, आकार, फुले-फळे-प्राणी यांची ओळख आणि खेळांविषयी माहिती दिली जाते.
वस्तीवरील मुले
रोज उपस्थित मुले
नगर परिषद शाळेत प्रवेश
संस्थेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मुलांच्यात व त्यांच्या पालकांच्यात मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षणाविषयीचे महत्त्व दिसू लागले. २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात जून २०२५ अलिबाग नगर परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांच्या सहकार्यामुळे या वस्तीवरील ८ मुले अलिबागनगर परिषदेच्या शाळेत प्रवेश मिळवून शिक्षण घेत आहेत.
तेथील शिक्षकांनी सुद्धा संस्थेच्या पाठपुराव्यामुळे मुलांच्यात सकारात्मक बदल दिसून येत असल्याचा अभिप्राय दिला आहे.




उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेअंतर्गत दिनांक १५/०५/२०२५ रोजी उज्ज्वल भविष्य मैत्री ग्रंथालय पिंपळभाट ता. अलिबाग जि. रायगड येथे स्थापन करण्यात आले. समाजाचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, क्रीडा व धर्मादायी, बौद्धिकदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीकोनातून स्थापना करण्यात आली आहे.
पुस्तके, साहित्य दान किंवा स्वयंसेवक म्हणून सहभागासाठी संपर्क करा.
संपर्क करा छायाचित्र दालन पाहा